*जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर ज्युनिअर अँड सिनिअर कॉलेज आवार येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
आज दिनांक ०३ जुलै २०२३ रोजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आवार येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी संस्थेच्या सचिवा प्रा सौ सुरेखाताई गुंजकर यांच्या हस्ते माता सरस्वती पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आज गुरुपौर्णिमा आपले प्रथम गुरू आपले आई वडील असतात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मूल आई वडीलांनाशी नीट बोलत नाही त्या मुळे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही यशाच्या शिखरावर पोहोचताना योग्य मार्गदर्शनाची गरज असते,ते मार्गदर्शन योग्य गुरु देऊ शकतो. त्यासाठी आयुष्यात गुरु ची आवश्यकता असते त्यांच्या द्वारे संस्कार आणि ज्ञान हे दोन्ही गोष्टी सोबत मिळतात अश्या या गुरूचे वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतो. असे प्रा गुंजकर मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची गीत ,भाषण सादर करून आपल्या गुरु शिक्षकांना वंदन केले.यावेळी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष अल्ल्हाट,घोडके सर , ब्राम्हणे सर ,मोरे सर, बंड सर, अजितसिंग जाट सर, ठाकरे मॅडम , डाबरे मॅडम, मोरे मॅडम ,शेलकर मॅडम ,वाघमारे मॅडम ,खैरे मॅडम,लोखंडे मॅडम , डिक्कर मॅडम , सांजोरे मॅडम , दारमोडे, भोपळे मॅडम आदी शिक्षक यांच्या समवेत सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर सहकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता वृक्षरोपणाने करण्यात आली.
Post a Comment