शेगाव तहसिल कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरण

खामगांव,दि.४-(उमाका)तहसिल कार्यालय शेगांव करीता नवीन इमारत बांधणेसाठी शासनाकडून मंजूरात प्राप्त झालेली असून तहसिल कार्यालयाचे नवीन बांधकाम सुरू झालेले आहे, त्यामुळे नविन इतारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तालुक्यातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तहसिल कार्यालय शेगांव हे तात्पुरत्या स्वरुपात श्री संस्थानच्या खामगांव रोडवरील वाटीका संकूलात स्थलांरीत करण्यात आले होते. परंतू तहसिल कार्यालय, शेगांव या नविन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने बांधकामासाठी अवधी लागणार आहे. शिवाय संस्थानला पुर्व नियोजित सेवाकार्य राबविण्यासाठी वाटीका संकूलातील इमारत व परिसर मोकळा होणे आवश्यक आहे.


त्यामुळे शेगांव तालुक्यातील ग्रामीण व शेगांव शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज सुलभ होण्यासाठी रोकडिया रोडवरील श्री सप्तश्रृंगी देवी मंदीर व श्री रोकडिया हनुमान मंदीरा समोरील श्री संस्थेचे सेवक निवास या संकुलातील इमारतीमध्ये तहसिल कार्यालया करिता श्री संस्थानने जागा व इमारत सेवार्थ (निशुल्क) उपलब्ध करून दिलेली आहे.


तसेच तहसिल कार्यालयातील अभिलेख (रेकॉर्ड) विभाग सध्या आहे, त्याच जुन्या तहसिल कार्यालयात राहतील व त्यांचे कामकाज तिथुनच चालेल तरी तालुक्यातील सर्व नागरीकांनी अभिलेख विभाग सोडून इतर विभागांशी संबंधित कामकाज असल्यास श्री संस्थानच्या वाटीका संकूलातील विद्यमान तहसिल कार्यालय रोकडिया रोडवरील श्री सतश्रृंगी देवी मंदीर व श्री रोकडिया हनुमान समोरील श्री संस्थेचे सेवक निवास या संकूलातील जागा व इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.तहसिल कार्यालया संबंधित कामकाज असल्यास नागरिकांनी स्थलांतरीत झालेल्या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन, तहसिलदार शेगांव समाधान सोनवणे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post