आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आषाढी एकादशी निमित्त विठोबा रुक्माई ची पालखी व  दिंडी सोहळा

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- स्थानिक  घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आषाढी एकादशी निमित्त विठोबा रुक्माई ची पालखी व  दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. आदर्श ज्ञानपीठ येथे सर्वप्रथम महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष के आर राजपूत यांच्या हस्ते विठ्ठल - रुक्माई यांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली .


यावेळी संस्थेचे सचिव जितेंद्र सिंह चव्हाण तसेच सदस्य सौ संगीता चव्हाण, कवीश्वर राजपूत, प्रियंका राजपूत यांच्या विशेष उपस्थितीत दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. दिंडीला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची पारंपारिक  वेशभूषा करत दिंडीची शोभा वाढवली. टाळाच्या गजरात पावली खेळत विद्यार्थ्यांनी परिसरातील लोकांची तसेच उपस्थित पालक वर्गाची मने जिंकून घेतली. विठ्ठल रुक्माईची पालखी आदर्श ज्ञानपीठ येथून सरस्वती माता मंदिरात पोहोचल्या वर फुगडी तसेच पावली खेळत विठुरायाच्या नामाचा गजर करत सर्व वातावरण भक्तिमय केले. सरस्वती माता मंदिरात विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला.  पालखी सरस्वती माता मंदिरातून परिसरातील गजानन महाराज यांच्या मंदिरात पोहोचल्या वर फराळाचे तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.  पालखीत लहान वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता.

या चिमुकल्या वारकऱ्यांनी  सर्वांचे मन मोहुन घेतले होते. विद्यार्थिनी केलेला विठुरायाच्या नामाचा  गजराने व दिंडी सोहळ्याने सर्व परिसर भक्तिमय झालेला होता. यानंतर आदर्श ज्ञानपीठ येथे दिंडी सोहळ्याचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या अनिता पळसकर, ममता महाजन, ज्योती वैराळे, माधुरी उगले, अश्विनी देशमुख, कल्पना कस्तुरे, अलका वेरूळकर, सरदेशमुख, प्रिया देशमुख, दामिनी चोपडे, प्रतीक्षा साबळे, विजया पोकळे, वाडेकर, गिरी, कोमल आकणकर, वक्ते, सपना हजारे, पिवळटकर, सुवर्णा वडोदे, राजकन्या वडोदे, वंदना गावंडे, लटके, सपकाळ, गावंडे आदींनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post