सर्वप्रथम लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव पोहोचला पूरग्रस्तांच्या मदतीला.
जनोपचार न्यूज नेटवर्क:- सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये भयानक अतिवृष्टी ज्याला ढगफुटी म्हणता येईल तो प्रकार घडला व पर्वतरांगातून येणाऱ्या सर्व नद्या ज्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यामधून जिल्ह्यामधल्या सर्वात मोठ्या पूर्णानदी ला विलीन होतात. ह्या सर्वच्या सर्व नद्या अतिशय विक्राळ रूप धारण करून फार भल्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढेच्या लोंढे घेऊन सोबत जंगलामधील दगड धोंडे यांच्यासह अतिशय वेगवान पाण्याच्या प्रवाहामध्ये लोकांची घरे बेचिराख करत शेती मधली उभी पिके यांच्यासह शेतातील माती सुद्धा खरडून घेऊन पुढे धावत होत्या. परिसरातील पुराच्या तडाख्यात आलेली पक्की घरे कच्ची घरे सर्वच्या सर्व कुठल्याही प्रकारचे अस्तित्व मागे न ठेवता वाहून गेलेली आहेत.
कित्येक गुरेढोरे कित्येक घरातील सर्व साहित्यासह वाहून गेलेली आहेत. आपला कसाबसा जीव वाचवित लोकांनी गावातील उंच ठिकाणे गाठली व जीव मूठीत धरून स्वतःचे रक्षण कसे होईल याचे प्रयत्न करीत होते. हा सर्व आहाकार दिवसा झाल्यामुळे जीवित हानी झाली नाही परंतु प्रकार जर रात्री झाला असता तर आज परिसरातील शेकडो परिवार बेपत्ता असते या ठिकाणी सर्व नद्यांचे पूल वाहून गेलेले असून मदत पोहोचवणे प्रशासनालाही शक्य झाले नाही परंतु लॉयन्स क्लब खामगाव संस्कृती चे सदस्य यांनी मात्र आपल्या जीवाची परवा न करता परिसरामध्ये आटा, तांदूळ, तुरडाळ, चणाडाळ, तेल मीठ इत्यादी सर्व साहित्य विविध ठिकाणच्या विविध गावांमध्ये असलेल्या मंदिर शाळा व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड मधील वास्तव्यास असलेल्या बेघर गरजवंत यांना दिले, तसेच कपड्यांचे सुद्धा मदत यावेळी करण्यात आली.
यावेळेस घाट पळशी, आसलगाव धानोरा इत्यादी गावांना पहिल्या टप्प्यात मदत पोहोचवण्यात आली याप्रसंगी लॉयन्स क्लब संस्कृती अध्यक्ष लॉ डॉ.भगतसिंग राजपूत, सचिव लॉ राजेंद्र थाडा, झोन चेअर पर्सन लॉ संजय उमरकर, लॉ अशोक गोयनका,लॉ डॉ.सीएम जाधव, लॉ सुरज बी अग्रवाल, व लॉ गजानन सावकार तसेच इतर सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रशांत राजपूत व त्यांचे सर्व सहकारी राजेंद्र भारसाकडे व त्यांचे सहकारी, विश्वंभर वावगे व त्यांचे सहकारी हे सर्व उपस्थित होते.
Post a Comment