गौरव

 राहुल मघाडे साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित


बुलढाणा :- जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कोलारा येथील श्री राहुल मधुकर मघाडे हे प.पू.राष्ट्रसंत भैय्युजी महाराज प्रणित सूर्योदय आदिवासी आश्रम शाळा खामगांव येथे शिक्षक असून त्यांना 29 जून 2023 वार गुरुवारला औरंगाबाद येथे साहित्य,शैक्षणिक,व सामाजिक क्षेत्रातील उल्लेख निय कार्यामुळे 'निळे प्रतीक' या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय 'साहित्यभूषण' पुरस्कार जेष्ठ साहित्यिक,व समीक्षक मा.प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, मा.प्रा.आर्याजी धम्मदर्शना महाथेरी,मा.धनराज गोंडाणे जेष्ठ साहित्यिक व समीक्षक  व संपादक निळे प्रतिक मा. रतनकुमार साळवे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह याचे वितरण करण्यात आले.त्यांचे पारध्याचं पाल,नामाचा टायसन,या झोपडीत माझ्या, प्रेतावरल्या भोंग्याच जिणं,अमान्य कटुसत्य,डफडं,जीवन एक संघर्ष, टीचभर पोटासाठी,युगपुरुष- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,असे अनेक नानाविध प्रकारचे लेख व सामाजिक विषयावरील कविता वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आहे.राहुल मघाडे यांच्या सत्कारामुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post