वंचितचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
खामगाव प्रतिनिधी: घारोड येथील सन १९९० पुर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबतचे तहसिलदार खामगांव यांचेकडून प्राप्त प्रस्ताव मंजुर करुन अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी जिल्हाधिकारी यांना १९ जून रोजी निवेदन दिले आहे .
खामगाव तालुक्यातील घारोड येथील अतिक्रमणधारक शेतकरी सन १९७८ सालापासून शासनाच्या ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. सन १९९१ च्या शासन निर्णयानुसार १४ एप्रिल, १९९० पूर्वीचे ई-क्लास जमिनीवर अतिक्रमणीवरील नियमानुकूल करण्यात यावे असा शासन आदेश होता. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार तहसिल कार्यालय, खामगांव यांचेकडे अतिक्रमण नियमानुकूल बाबत आवश्यक कागदपत्रांसह दावे दाखल केले होते. परंतु सदर दावे पात्र असतांनाही त्यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता. सदर प्रकरणी एकूण १० शेतकऱ्यानी सदर दावे नियमानुकूल करणेबाबतच्या मागणीसाठी १३ जून पासून तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. दरम्यान तहसिदार खामगांव यांनी सदर दावे आवश्यक त्या पडताळणीसह उपजिल्हाधिकारी (महसुल) यांचेकडे सादर केलेले आहेत. त्यानुसार उपोषणकर्त्यांनी शासनाच्या विनंतीस मान देवून उपोषणाची सांगता केली होती. तरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठविण्यात आलेले दावे मंजुर करण्यात यावे जेणेकरुन कोणत्याही पात्र अतिक्रमणधानकांवर अन्याय होणार नाही अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी दिला आहे.निवेदन देता वेळी सुनिल इंगोले, रमेश गवारगुरू, वैभव ठाकरे, रामदास इंगळे, मधुकर इंगळे, सखाराम इंगोले, धोंडू इंगळे, प्रल्हाद इंगोले, नारायण इंगोले, अजाबराव इंगोले, गजानन इंगोले उपस्थीत होते. सदर निवेदनाच्या प्रती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्याचे मुख्यमंत्री,महसुल मंत्री यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.l फोटो -
Post a Comment