खामगाव तालुका भाजपचा जेष्ठ कार्यकर्ता संवाद मेळावा

 आपल्या सर्वांच्या पक्ष कार्यामुळेच आज भारत महासत्तेलाही झुकवू शकला--  आ अँड आकाश फुंडकर,                       


खामगाव_ ::-  आपण पक्षासाठी कठीण काळात केलेल्या कामामुळे आज भाजप जगात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, आपण केलेल्या पक्ष कार्यामुळेच आज मोदींजीं आणि आपला देश जगाची महासत्ता अमेरिकेलाही झुकण्यास भाग पाडू शकत आहे, असे प्रतिपादन भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्याना भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी केले.     

                      सेवा, सुशासन व गरीब कल्याण या त्रिसूत्री वर मा.पंतप्रधान श्री. नरेंद्रजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या 9 वर्ष पूर्ण झाले यानिमित्त Modi @9 महाजन संपर्क अभियान  अंतर्गत 24 जून रोजी दुपारी घाटपुरी रोड वरील श्रीधर महाराज संस्थान वारकरी भवन चोपडे मळा येथे खामगाव तालुका जेष्ठ कार्यकर्त्यांच्या "भव्य संवाद मेळावा" आयोजित करण्यात आला होता,  त्यावेळी आ अँड फुंडकर बोलत होते. 

यावेळी मंचावर भाजप सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर, मिसा बंदीतील स्वातंत्र्य सैनिक रामेश्वरकाका घोराडे, खविस माजी अध्यक्ष बाबुरावसेठ लोखंडकार,  जेष्ठ साहित्यिक रामदादा मोहिते, शत्रुघ्न पाटील, गजाननराव देशमुख, राजाराम पाटील, ह भ प श्रीराम खेडकर, खविस उपाध्यक्षा सौ गोदावरी ताई ढोण, डॉ एकनाथ पाटील, समाधान सावळे, प स माजी सभापती पुंडलिकमामा घोगरे, भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित , तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ,शेगाव तालुकाध्यक्ष विजय भालतीडक, यांची प्रमुख उपस्थिती होती. 


या भव्य संवाद मेळाव्यात बोलताना आ अँड फुंडकर म्हणाले की जुन्या काळात जनसंघ नंतर भाजप वाढविण्यासाठी आपण जेष्ठांनी अनेक वेदना सहन केल्या. परंतु आपण पक्षाशी एकनिष्ठ राहिले, त्यामुळेच आज भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. आपल्यामुळेच आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मोठी ताकद मिळाली आहे. अनेक जनकल्याणकारी योजनेच्या माध्यमातून देशातील गोरगरीब शेवटच्या घटकाला न्याय देण्याच काम सुरू आहे. घरकुल, वीज, पाणी, चांगले महामार्ग, शेतकरी सन्मान निधी, मोफत रेशन, कोरोनात सर्वांना मोफत लस, असे अनेक कार्य मोदींनी केले. येत्या एक दीड वर्षात जिगाव प्रकल्प पूर्ण होणार आहे, त्यातून खामगाव मतदार संघातील 70 टक्के गावातिल शेती ओलिताखाली येणार आहे, प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीला थेट पाण्याचे कनेक्शन देण्यात येणार आहे, यासाठी काम अंतिम टप्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. असे अनेक कामे होत आहेत. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपली संख्या पाहून आपल्या सर्वामध्ये स्व.भाऊसाहेब दिसत आहेत, त्यांसोबतची आपली साथ आपल्या आठवणी डोळ्यासमोर येत आहेत असे आ अँड फुंडकर म्हणाले. तसेच आज पुन्हा आपल्या अनुभवाची गरज आहे, सर्व राजकीय पक्ष केवळ मोदींना पाडण्यासाठी एकत्र येत आहे. त्यामुळे उपस्थित सर्वांनी मोदी सरकारचे सर्व जन कल्याणकारी योजना व कार्य घरोघरी पोहोचवा ,   असे आवाहन आ अँड फुंडकर यांनी उपस्थित जुन्या जाणत्या जनसंघापासून स्व भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबत काम केलेल्या खामगाव तालुक्यातील जेष्ठ मंडळींना केले. यावेळी मंचावरील सर्व जेष्ठ मंडळींनी मार्गदर्शन केले.  महासंपर्क अभियान संयोजक तथा भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विजय महाले, सुनील वानखडे, आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. या संवाद मेळाव्यात खामगाव तालुक्यातील सुमारे दीड हजार  जेष्ठ मंडळी उपस्थित होते.  या संमेलनाचे संचालन सुरेश गव्हाळ यांनी तर आभार प्रदर्शन विजय महाले यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post