पॉलीटेक्नीक रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ

 पॉलीटेक्नीक प्रथम वर्षात प्रवेश इच्छूक विद्यार्थी दि. ३० जुन २०२३ पर्यंत आपले रजिष्ट्रेशन,डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन तसेच (FC) कन्फर्मेशन सायकांळी ०५ वाजेपर्यंत सुविधा केंद्रावर पूर्ण करुशकतील. 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रथम वर्ष पॉलीटेक्नीक मध्येप्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिष्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरीफीकेशन तसेच F.C. कन्फरमेशनकरण्याकरीता २१ जुन २०२३ पर्यंत कालावधी देण्यात आलेला होता.


मात्र पॉलीटेक्नीक प्रथम वर्षात प्रवेश इच्छूक विद्यार्थी दि. ३० जुन २०२३ पर्यंत आपले रजिष्ट्रेशन,डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन तसेच (FC) कन्फर्मेशन सायकांळी ०५ वाजेपर्यंत सुविधा केंद्रावर पूर्ण करुशकतील. असे परीपत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने नुकतेच प्रदर्शित केले.

सदर प्रक्रियेसाठी रविवार ला सुध्दा सुविधा केंद्र सुरु राहतील. प्रथम वर्ष पॉलीटेक्नीक मध्ये प्रवेशइच्छुक विद्यार्थ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा व मोठया संख्येने सुविधा केंद्रावर प्रक्रिया पूर्ण करावीअसे आव्हान सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस, सुविधा केंद्र १२६८ च्या प्राचार्या प्रा. प्रिती अ. चोपडे यांनीकेले. विद्यार्थ्यांना अधिक माहितीसाठी व चौकशीसाठी सुविधा केंद्रावरील हेल्पलाईन क्रमांक

९७३०८३६१००, ९८३४५८२६६१, ९६०४४१६२९२, ९८५०३२२१८२ सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत दररोज

कार्यरत असतील अशी माहिती एका पसंती पत्रकांतून दिली.

Post a Comment

Previous Post Next Post