सोयाबीन व खत चोरणारी टोळी गजाआड : 03,48,977 रु. चा मुद्येमाल जप्त.
(नितेश मानकर)
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- फिर्यादी अंकुर अशोक अग्रवाल रा. अमृतबाग,खामगांव यांनी पो स्टे शिवाजी नगर, खामगांव येथे रिपोर्ट दिला की, दिनांक14/06/2023 चे 08/30 वा ते दिनांक 15/06/2023 चे 09/30 वा. दरम्यान कोणीतरीअज्ञात चोरट्यांनी गोडावुन चे मागील भिंतीतील सिंमेटची खिडकी तोडुन आत प्रवेशकरुन गोडावुन मध्ये ठेवलेला 7,06,050/- रुपयाचा मुद्येमाल चोरुन नेला अश्यारिपोर्टवरुन पो.स्टे. ला अप नंबर 174/23 कलम 380, 461 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करुन ठाणेदार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवी पथकाने शोध घेतला.तपासादरम्यान ङिबी. पथक पो.स्टे. शिवाजी नगर, खामगांव यांनी गोपनिय बातमीदार यांच्या मार्फतीनें माहिती काढुन सदर गुन्हयांतील अज्ञात चोरटे 1) राहुलईश्वर चव्हाण वय 20 वर्ष रा. शिवाजी फैल, खामगांव 2) विजय रामा मांडवेकर वय 26 वर्षरा. शिवाजी फैल, खामगांव 3) योगेश ज्ञानदेव एंडोले वय 33 वर्ष रा. सुटाळा खुर्द ता.खामगांव 4) दिपक गजानन गवळी वय 23 वर्ष रा. खुटपुरी ता. खामगांव यांना ताब्यातघेवून सखोल व बारकाईने विचारपुस केली असता नमुद आरोपीने सदरचा गुन्हा त्यांनीव त्यांच्या साथीदारासह केलेला असुन गुन्हयांतील चोरलेला माल वाहनाने पोरजशिवारात असलेल्या
नाल्याजवळील गड्यामध्ये ठेवलेला असल्याची कबुली दिल्याने सदरठिकाणी जावुन खात्री केली असता तेथे गुन्हयांतील सोयाबीन व खताचा एकुण3,48,977/- रुपयाचा मुद्येमाल मिळुन आल्याने हस्तगत केला आहे. गुन्हयांतील ईतरआरोपी व गाडी हस्तगत करणे बाकी आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक, सुनिल कडासने ,अपर पोलीस अधिक्षक थोरात, . बी.बी. महामुनी अपर पोलीसअधिक्षक, बुलडाणा, विनोद ठाकरे उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांवयांच्या मार्गदर्शनाखाली अरुण परदेशी ठाणेदार पो.स्टे. शिवाजी नगर यांच्याआदेशाने सपोनि. विलास मुंढे, पोहेकाँ निलसिंग चव्हाण, नापोकाँ देवेंद्र शेळेक,नापोकाँ संदीप टाकसाळ, नापोकाँ संतोष वाघ, नापोकाँ राजु कोल्हे,पोकाँ प्रविण गायकवाड व पोका देवेंद्र देशमुख पो.स्टे. शिवाजी नगर,खामगांव यांनी केलेली आहे.सदर गुन्हयांचा पुढील तपास सपोनि. विलास मुंढे व ङिबी.पथक पो.स्टे. शिवाजीनगर हे करीत आहे.
Post a Comment