एमडी रेडिओलॉजी मध्ये विमल दुगड विभागामधून प्रथम
खामगाव दि25:- ज्येष्ठ पत्रकार गौतमजी दुगड यांचा मुलगा विमल एमडी रेडिओलॉजी मध्ये मेडिकल कॉलेज मधील विभागात प्रथम आल्याने सर्व स्तरावरून त्याचे अभिनंदन होत आहे.
विमल दुगड याचे शालेय शिक्षण येथील लायन्स ज्ञानपीठ मध्ये झाले लहानपणापासून त्याला मेडिकल क्षेत्रामध्ये जाण्याची आवड होती. वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या नीट मध्ये त्याला चांगले मार्क्स मिळाल्याने त्याला एमबीबीएस जळगाव खान्देश येथील उल्हासराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. एमबीबीएस चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथे २०२० मध्ये MD Radiology या ब्र्यान्चकरीता ॲडमिशन घेतले. ३ वर्षाचा सदर कोर्सचा नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला .तसेच वैद्यकीय महाविद्यालयातून मधुन तो सर्वप्रथम आला आहे ..
Post a Comment