योग शिबिर

 सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज ह्यांच्या आदेशानुसार 'आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त' योग शिबीराचे आयोजन


(खामगांव ) - संपुर्ण जगतात २१ जुन हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. योगामुळे मानवी जीवनाचे मानसिक तथा शारीरिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. संत निरंकारी मिशनच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज (संत निरंकारी मंडळ, दिल्ली) ह्यांच्या आदेशानुसार संत निरंकारी मिशनमध्ये सुध्दा संपुर्ण भारतात हा दिवस १ दिवसीय योग शिबीराचे आयोजन करुन साजरा करण्यात येत आहे. स्थानिक संत निरंकारी ब्रँच, खामगांव च्या वतीने सुध्दा २१ जुन रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत योग शिक्षिका श्रीमती शोभाताई बाळापुरे ह्यांची उपस्थिती लाभणार असुन ह्याचा लाभ स्थानिक नागरिकांनी तसेच भाविक भक्तांनी घ्यावा अशी विनंती खामगांव ब्रँच मुखी अजयजी छतवाणी ह्यांनी केली आहे. (स्थळ: संत निरंकारी मंडळ, श्री चोपडे ह्यांच्या मळ्याजवळ, खामगांव



Post a Comment

Previous Post Next Post