खबरदार खामगाव

 


व्हाट्सआप,सोशयल मीडिया चालकांनो,कोणत्याही समाज,पंथ,वंश, धर्माच्या भावना दुखावतील,असे संदेश व्हायरल केले तर खबरदार!खामगाव शहर पोलीस,बुलडाणा सायबरची अशांवर असेल करडी नजर..!


              खामगाव:- नुकतेच सोशयल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या पोस्ट वा मेसेज मुळ जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांनी अकोला, कोल्हापूर व  अमळनेर वअन्य काही ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

त्याकरिता खबरदारी म्हणून खामगाव शहर पोलिसांनी आपल्या हद्दीतील सर्व व्हाट्सआप ग्रुप अँडमिन,सदस्य यांना सक्त ताकीद दिली आहे. खामगाव शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार शांती कुमार पाटील यांनी त्यांना असलेल्या अधिकाराखाली (खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील) व्हाट्सआप गृफ व सोशल मीडिया चालकांना १४९ ची नोटीस दिली आहे.आपण आपल्या मोबाईल मधील कोणताही समाज, पंथ, वंश व धर्माच्या धार्मिक भावना दुखावतील, दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल. अशा प्रकारची कोणतीही माहिती - संदेश सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये. ज्यामुळे कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या संबंधित व्यक्तीला सर्वस्वी जबाबदार धरून त्याच्याविरुद्ध योग्य ती प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदर नोटीसही त्या व्यक्तीविरुद्ध कोर्टात पुरावा म्हणून सादर केली जाणार आहे. यासह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्यांवर खामगाव शहर पोलिसांची व सायबर विभाग बुलढाणा याची करडी नजर असून त्या व्यक्ती वर भारतीय कायद्यांवये 295A 153 A 505 ( 2) नुसार गुन्ह्यास पात्र राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यलय व शहर पोलिचांचे वतीने सांगण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post