खड्डे मुक्त शहरासाठी

 खड्डयाचा फोटो काढा अन पीसीआरएस ॲपवर टाका

७२ तासात बुजविला जाणार खड्डा

सा बा. विभागाचे कार्यकारी अभियंता थोटांगे यांचे आवाहन


खामगाव रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नवी प्रभावी प्रणाली अंमलात आणण्यात आलीआहे. पीसीआर अॅपद्वारे खड्डेमुक्त योजना राबविण्यात येत असून नागरिकांनी रस्त्यावरीलखड्ड्यांचा फोटो काढून अॅपवर टाकल्यास ७२ तासाच्या आत सदर खड्डा बुजविण्यात येणारआहे. खामगाव तालुक्यात ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून नागरिकांनी या अॅपचालाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता थोटांगे यांनी केले आहे.


खड्डे मुक्त योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता महाराष्ट्र शासनाद्वारे पीसीआरएस(PCRS) अँप सुरु करण्यांत आले आहे. या माध्यमातून बुलडाणा जिल्हयातील सा. बां.विभाग, खामगांव अंतर्गत तालुक्याला खड्डेमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.सामान्य माणसांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी नागरिकांनी पीसीआरएस (PCAS) हे अॅपआपल्या मोबाईल मध्ये Play Store मधुन डाउनलोड करुन घ्यावे. कोणत्याही नागरिकांचीखड्डया विषयी तक्रार असल्यास त्याने आधी खड्याचा फोटो काढावा व त्यानंतर सदर प्रणालीमध्येतो फोटो अपलोड करावा. सदरच्या फोटो वरुन रस्त्यावर पडलेला खड्डा ७२ तासाच्या आतभरण्यात यावा, अशा सूचना कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगांव यांनीदिलेल्या आहेत. कोणत्याही नागरिकांनी रस्त्यावर खड्डा दिसल्यास त्याचा त्वरित फोटो काढूनअपलोड करुन संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दयावे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डेत्वरीत भरल्या जाणार असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर होईल. तरीनागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये सदर अॅप Play Store मधुन डाउनलोड करून घेण्याचेतसेच रस्त्यावरील खड्डयाबाबत काही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक ९१-२२-२६२०१६०४वर संपर्क करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी.थोटांगे यांच्यावतीने करण्यांत आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post