उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिवपदी संदीप जोशी यांची नियुक्ती
नागपूर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिव (Honorary Secretary) म्हणून माजी महापौर श्री. संदीप जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून ही माहिती दिली आहे.
संपूर्ण विदर्भातून येणा-या विविध समस्या आणि निवेदनांच्या समन्वयाची जबाबदारी श्री. संदीप जोशी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
Post a Comment