महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीदिनी वंचितच्या वतीने अभिवादन कार्यक्रम
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:
भारताचे वीर योद्धा महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती खामगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक टॉवर गार्डन येथिल महाराणा प्रतापसिंह अश्वारूढ पुतळ्याला त्यांच्या जयंती दिनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांच्या हस्ते हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संघपाल जाधव, संचालक राजेश हेलोडे, रमेश गवारगुरु, प्रकाश दांडगे, राजू चव्हाण, रामधन वानखडे, शंकर गवई, प्रवीण इंगळे, योगेश हिवराळे, प्रवीण मांडवकर, अमर तायडे, हर्षवर्धन खंडारे, अविनाश हिवराळे, दीपक मोरे, विशाल तायडे, प्रमोद जावडेकर उपस्थित होते.
Post a Comment