परभणी जिल्हयातील उखळद येथील घटनेचा खामगावात तीव्र निषेध
परभणी जिल्हयातील उखळद येथे गैरसमाजातून मोजक्या संतप्त समाजकंटकानी शीख समाजातील किरपानसिंघ सुजीतसिंग भौड यांची निघुर्ण हत्या आल्याने खामगाव येथील शीख बांधवांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त केला. निवेदनात नमूद आहे की. काहीही एक कारण नसताना कायदा व सुस्वस्थेचा प्रश्न निर्माण करीत काही मोजक्या समाजकंटकांनी हे कृत्य केले. यात एका निष्पाप शीख समाज बांधवाचा नाहक बळी गेला. त्यानंतर या घटनेला वेगळेवळण देण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून केला जात आहे. ही घटना अतिशय निंदनियअसून या घटनेची निःपक्ष चौकशी करून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
तसेचकिरपानसिंघ सुजीतसिंग गौड याच्या मृत्यूस आणि इतर दोंघा वर हल्ला करणार्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा सीख समाज बांधवांच्यावतीने निदर्शने करण्यात येतील.
Post a Comment