महात्मा फुले पतसंस्थेची आमसभा उत्साहात संपन्न
नातवंड सूक्ष्मठेव योजनेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
खामगाव :_ महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्था खामगाव ची 31वी आमसभा रविवार दिनांक 21 मे रोजी उत्साहात संपन्न झाली . सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष गजाननराव राऊत होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सुटाळा बु च्या सरपंच तथा कृषी व उत्पन्न बाजार समितीच्या संचालक सुलोचनाताई वानखडे उपस्थित होत्या.
पतसंस्थेला तीस वर्षे पूर्ण झाले असून या पतसंस्थेच्या उन्नती करिता पतसंस्था खामगाव माळी भवन येथून नांदुरा रोडवरील श्री गजानन हाइट्स सुटाळा बु या इमारतीमध्ये विस्तारित करण्याचे आमसभेमधे ठरले आहे.
संस्थेची आणखी प्रगती होऊन संस्थेची सभासद संख्या दुपटीवर करणे तसेच संस्थेच्या ठेवीमध्ये वाढ करणे आणि सभासदांसाठी अनेक लाभदायी योजना राबविणे असे या आमसभेमध्ये संचालक मंडळातर्फे निश्चित करण्यात आले आहे.
नातवंड सुक्षम् ठेव योजना ही दरमहा अल्पबचत योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये एक ते अठरा वर्षापर्यंत असलेल्या नातवंडाच्या नावावर पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त रुपये दरमहा पतसंस्थेमध्ये ठेवल्यास पाच वर्षानंतर 75 हजार रुपये त्या सभासदाला मिळणार आहेत .
त्यामुळे ही योजना नातवंडासाठी अत्यंत लाभदायी असून या योजनेचे आमसभेच्या दिवशीच अकरा सभासद जुळले आहेत. तसेच यानंतर सुद्धा अनेक सभासद मिळणार असून ह्या योजनेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे .
तसेच महिला बचत गटांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरित करण्यात येत असून अनेक बचत गटांनी छोटे लघुउद्योग , घरगुती व्यवसाय सुरू केले आहेत.
संस्थेच्या या लाभदायी योजना सभासदांना फायदेशीर ठरत असल्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांचा कल महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्था रजिस्टर नंबर 860 कडे वळाला आहे .
अनेक ठेवीदार स्वतःहून ठेव ठेवण्यासाठी पतसंस्थेमध्ये येत आहेत . विश्वास हीच आमची परंपरा असे संचालक मंडळाचे ब्रीदवाक्य आहे .
महात्मा ज्योतिबा फुले पतसंस्थेमध्ये खामगाव तालुक्यातील अनेक महिला बचत गट जुळले असून नियमित कर्ज परतफेड करत आहेत .
श्री गजानन हाईट्स , नांदुरा रोड, सुटाळा बु येथे संपन्न झालेल्या 31 व्या आमसभेत ज्या लोकांनी ही पतसंस्था स्थापन केली असे लक्ष्मणराव वानखडे , शंकरराव वानखडे यांचा सत्कार करण्यात आला . तर सुटाळा बु येथील सरपंच सुलोचनाताई श्रीकांत वानखडे यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव येथे संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सुटाळा बु ग्रामपंचायत सदस्य संतोष बगाडे, विनोद भोपळे , महादेव बनकर, सुनील वानखडे यांचाही सत्कार करण्यात आला .माजी पंचायत समिती सभापती उर्मिलाताई गायकी यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला . पतसंस्थेच्या या सभेला सभासदांची चांगलीच उपस्थिती होती .
या सभेत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या महिला बचत गटांचा सुद्धा सत्कार करण्यात आला . ठेवीदार जयराम बगाडे गुरुजी , सौ नर्मदा बगाडे , विजय वाढोकर ,श्रीराम नावकर यांचाही सत्कार करण्यात आला.
आमसभेला महात्मा फुले पतसंस्थेचे संचालक मंडळ , उपाध्यक्ष विजयकुमार वावगे, सचिव एकनाथ इंगळे संचालक सुभाषराव निखाडे सुरेश सदाफळे, उल्हास वानखडे ,सुनीता ताई खराते , सौ रंजनाताई राऊत , प्रवीण माळी, महादेवराव खंडारे तसेच माळी सेवा मंडळाचे सचिव प्रदीप सातव कोषाध्यक्ष विनायक जुमळे आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिव एकनाथ इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन उल्हास वानखडे यांनी केले
Post a Comment