शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत शासनाच्या विविध योजनांबाबतचे माहिती देणारे व लाभ देणारे शिबिराचे खामगाव येथे 25 मे 2023 आयोजन
खामगाव दि- 22(उमाका)महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार विविध विभागांमार्फत पुरविण्यात येणारे शासकीय लाभ है पारदर्शक, गतिमान पध्दतीने एकाच छताखाली पुरविण्यासाठी “शासन आपल्या दारी हया उपक्रमाअंतर्गत आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली खामगांव तालुक्यामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहीती तसेच शासनाचे लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याकरीता श्रीहरी लॉन्स खामगांव येथे दिनांक 25/05/2023 रोजी सकाळी 9.00 वाजता पासून महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीरामध्ये शासनाच्या विविध योजना राबवणारे तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद इत्यादी विविध शासकीय कार्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत ची माहीती जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. तसेच त्यामध्ये पात्र लाभार्थ्याना त्यांच्या मंजूर योजनेचा प्रत्यक्ष लाभ ? त्याबाबतचे प्रमाणपत्र वा मंजूरीबाबतचे पत्राचे वाटप करण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खालील विभागांतर्गत विविध योजनांचा समावेश राहील.
1. तहसिल कार्यालय, खामगांव अंतर्गत :- 1.. विदयार्थ्यासाठीचे विविध प्रमाणपत्र 2 शिधापत्रिकांबाबत कामे 3. नवीन मतदार नोंदणी 4.पी.एम. किसान दुरुस्ती.5. संगांयो योजना 6 श्रावणबाळ योजना 7 इंगांयो योजना
2.पंचायत समिती खामगांव :- 1. पशुसंवर्धन शाखेच्या योजना 2. घरकुल योजना 3. जन्म मृत्यु कार्ड, इ- कार्ड 4. बचत गट
3. कृषी विभाग:- 1. कृषी प्रदर्शन 2. महा डीबीटी च्या विविध योजना 3. माती परीक्षण 4. गट नोंदणी 5. स्मार्ट कॉटन योजना
4 नगर परिषद विभाग:- 1. प्रधानमंत्री आवास योजना 2. स्वनिधी योजना 3. नळ जोडणी व इतर सेवा 4. दाखले, जन्म मृत्यु नोंदणी 5. बचत गट
5. शिक्षण विभाग:- 1. Right to education लाभ 2. दिव्यांगांसाठीचा मदतनीस भत्ता
6. आरोग्य विभाग:- 1. आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप 2. आरोग्य शिबीर 7. महिला व बालकल्याण विभाग:-शिलाई मशिन, पिठाची चक्की, मसाला उदयोग, बेबी केअर किट. 8. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर
वरील शासनाच्या योजनांची माहीती व लाभ घेण्यासाठी सर्व नागरीकांनी सदर शिबीरास मोठया संख्येने उपस्थीत राहावे तसेच ज्यांना शासनाच्या वरील योजनेमध्ये अर्ज सादर करुन मंजूरी मिळाली आहे. त्यांनी प्रमाणपत्र / प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी उपस्थीत रहावे असे आवाहन अतुल पाटोळे तहसिलदार खामगांव यांचे वतीने करण्यात येत आहे.
Post a Comment