गुणवत्ता हीच आमची ओळख-नरेश नागवानी

 

एन.के जुनिअर कॉलेज, अंत्रज,खामगाव

Thi is not a antraj school foto


एन.के जुनिअर कॉलेज ची यशाची परंपरा कायम! यावर्षी  ९८.५० टक्के निकाल

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- ग्रामीण भागातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्था म्हणजेच एन.के जुनिअर कॉलेज, अंत्रज, खामगांव यावर्षी सुधा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. ऑनलाईन पध्दतीने दि २५/०५/२०२३ ला जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी ६०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले.


त्यामध्ये जनरल सायन्स शाखाचा- १००%, फिशरी सायन्स शाखाचा- १००%, कला शाखा- ९१.६६% आणि वाणिज्य शाखेचा- १००% निकाल लागला आहे जनरल सायन्स विभागातुन शिवानंद विजय सातव हा कॉलेज मधुन प्रथम आला त्याला ८६.१७% गुण मिळाले. फिशरी सायन्स विभागातुन कु संजीवनी विजय आटोळे हि कॉलेज मधुन प्रथम आली तिला ८१.१७% गुण मिळाले.वाणिज्य विभागातुन कु चंचल विजय खंडागळे हि कॉलेज मधुन प्रथम आली तिला ६४.३३% गुण मिळाले.

कला विभागातुन कु रुखमिणा भानुदास खटके हि कॉलेज मधुन प्रथम आली तिला ६८% गुण मिळाले.खालील विद्यार्थ्यांनी व्दीतीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले.संजना नागवाणी ७८% (जनरल सायन्स), पल्लवी ठाकरे ६०% (वाणिज्य शाखा),ओम सिंघानिया ५२.७८% (वाणिज्य शाखा) दिक्षा सिरसाट ६७.८३% (कला शाखा)आरती बीलेवार ६७.३३% (कला शाखा) यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष .नरेशजी नागवाणी, संस्थेचे सचिव. सुनिलजी माळी तसेच प्राचार्य माणिकजी भटकर यांनी सत्कार केला. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post