आरपीएफ चे रंजन तेलंग यांनी पुन्हा एकदा संशयितास केले जेरबंद    

                                          रेल्वेत प्रवासादरम्यान आपापल्या वस्तूंवर योग्य लक्ष देण्याचे आवाहन केले असून कुठे संशयित आढळल्यास रेल्वे हेल्पलाईन नंबर 139 वर सूचित करण्याचे आव्हाहन केले आहे



   मे महिन्यात सुट्ट्या असल्याने ट्रेन ला असलेली गर्दी व त्या गर्दी चा फायदा उचलणारे चोर भामटे यांना लगाम लावण्यासाठी शेगाव आरपीएफ चे निरीक्षक रणवीर सिंह यांच्या निर्देशानुसार प्रधान आरक्षक यांनी केलेल्या कामगिरी त अजून एक भर पडली आणि पुन्हा एका संशयिताला तेलंग यांनी पकडून त्यावर कार्यवाही केली असून शेगाव रेल्वे सुरक्षा बलाने आतापर्यंत 16 आरोपींवर कार्यवाही करत बऱ्याच प्रमाणात चोरी ला आळा घातला आहे आज दिनांक 26 मे रोजी मध्यरात्री नंतर यात्रेकरु च्या सामानावर  पाळत ठेवलेल्या एका भामट्या स पुन्हा जेरबंद करून रंजन तेलंग यांनी उप निरीक्षक श्री एस के श्रीवास्तव यांच्या सोबतीने ही कार्यवाही करण्यात आली आहे सदर चा आरोपीवर यापूर्वी ही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत 

Post a Comment

Previous Post Next Post