"अभाविप च्या दीशा व्यक्तीमत्व विकास शिबीरातुन निश्चितच आपल्या व्यक्तीमत्त्वाला योग्य दिशा घेऊन जा - गणेश घोराळे"
खामगांव - स्थानिक मातोश्री जयाबेन जीवनलाल मेहता सरस्वती विद्या मंदिर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दोन दिवसीय दिशा व्यक्तिमत्त्व विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटक अभाविप चे जिल्हा प्रमुख गणेश घोराळे,नगर मंत्री रुषिकेश वाघमारे, शिबीर सह संयोजक गोरव शेगोकार मंचावर उपस्थित होते.
यावेळी उद्घाटनपर गणेश घोराळे यांनी व्यक्तिमत्त्व विकास शिबीराचे आवश्यकता विशद करून शिबिरातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणावरून आपल्या व्यक्तीमत्त्वाला निश्चितच दिशा घेऊन जावी असे आवाहन गणेश घोराळे यांनी केले.
शिबिरात पॉजीटीव्ह थिंकींग, व्यक्तिमत्त्व विकास, दहावी, बारावी नंतर काय?, स्पर्धा परीक्षा, अभिनय,सेल्फ डिफेन्स, विविध शैक्षणिक योजनांची माहिती आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.असे मत गणेश घोराळे यांनी व्यक्त केले
सदर उद्घाटन समोरोहाचे संचालन गायत्री मोकाडे, व्यंकटेश जुनारे प्रास्ताविक गौरव शेगोकार, आभार प्रदर्शन रुषिकेश वाघमारे यांनी केले.यावेळी राहुलजी खरात,सौ बग्गा, राहुल वाकेकर, प्रथमेश कोहळे, तेजस्विनी देशमुख, आनंद निकाळजे,रुषिकेश जांभे, गणेश कठाळे, सार्थक सेवतकर शिबिरातील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी उपस्थित होते.
Post a Comment