अभय पाटील यांची मागणी

 दुष्काळी अनुदान 13600 रू शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी 

       खामगाव:- 2022- 23 खरीप हंगामामध्ये सतत पाऊस चालू असल्याने चांदुर बिस्वा मंडळ उडीद मूंग सोयाबीन  कापूस मक्का तूर इ पिक सतत पाण्यामुळे खराब झाली होती  खराब झालेला पिकांचा सर्वे शासनाने  करून 13600 रू  दुष्काळी अनुदान जाहीर केले आहे दुष्काळी अनुदान  13600 रु रुपये तातडीने  देण्याकरिता चांदूर बिस्वा येथील अभय संतोषराव पाटील यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले निवेदनात नमूद आहे की चांदूर बिस्वा मंडळ सतत पाऊस चालू असल्याने सर्व पिके खराब झाली होती पिकांचा सर्वे करण्याकरिता   निवेदन दिली होत महसूल विभागाने सर्वे करून 13600 रु अनुदान जाहीर केले होते  पाच महिन्यापासून शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे त्याकरिता 13600 रु  तातडीने देण्याकरिता तहसीलदार यांना निवेदन दिले निवेदनाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले


Post a Comment

Previous Post Next Post