घरातील पाण्याच्या टाक्यात दहा वर्षीय चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू;
खामगाव:- घरात असलेल्या पाण्याच्या टाक्यात पडून १० वार्षिय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील पळशी बु येथे घडली आहे.
आर्यन कृष्णा नागे वय १० वर्ष रा. पळशी बु असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. आर्यन हा १७ मे च्या संध्याकाळी ५ - ५.३० वाजताच्या दरम्यान आपल्या भावंडासोबत घरात खेळत होता, याच वेळी तो घरातील पाण्याच्या टाक्यात जाऊन पडला व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.जेव्हा आर्यनची आई शेतातील कामावरून घरी आली त्यावेळी त्यांना पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे दिसले तर आर्यन त्या टाक्यामध्ये मृत्युमुखी पडलेला होता.बातमी लिहीपर्यंत पोलीस कारवाई चालू होती
Post a Comment