चिखली तालुक्यात हृदय हेलावून टाकणारी घटना घडलीय.एका सहावर्षय चिमुकलीची हत्या झाली आहे आता या चुमुकलिन काय गुन्हा केला होता ,की तिला ही सजा भट्टली.निश्चितच तिचा काही गुन्हा नसावा!.मग कोणी तिला मारलं? हे पोलीस शोधतीलाच.पण असे निर्दयी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला देव देखील माफ करू शकत नाही
चिखली तालुक्यातील तपोवन देवी संस्थान
येथून १२ मे रोजी एक ६ वर्षीय मुलगी
हरवली होती. मात्र काल तिचा मृतदेहच पोलिसांच्या हाती
लागला आहे. तपोवन येथील देवीच्या मंदिराच्या
पाठीमागील भागात ५०० मीटर अंतरावर मुलीचा
मृतदेह आढळून आला त्यामूळे खळबळ उडाली आहे.
मुलीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी
दिसत आहे.अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील विलास इंगळे एका
लग्नासाठी चिखलीला आले होते, दरम्यान ते तपोवन ला
गेले होते. यावेळी त्यांची मुलगी राधिका तिथून गायब
झाली होती. सगळीकडे शोध घेऊनही राधिका सापडली
नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार
दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला
होता. मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी आवाहन देखील
केले होते. अखेर आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास
राधिकाचा मृतदेह आढळला. तिच्या चेहऱ्यावर दगडाने
ठेचून तिची हत्या केल्याचे दिसत आहे.
Post a Comment