आर्टिका -बोलेरो आणि दुचाकीच्या विचित्र अपघातात तीन जण ठार: एक गंभीर
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव मेहकर रोडवरील देऊळगाव साखरशा नजीक आज रात्री घडलेल्या विचित्र अपघातात दुचाकी वरील तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्राने दिली .याबाबत समजलेल्या माहितीनुसार देऊळगाव साखरशा येथील शेख इरफान हुसेन ,सचिन नहार व लक्ष्मण गवई दुचाकीने जात असताना एका इंडिका कारवर धडकले दरम्यान मागून येणाऱ्या बोलेरो चालकाने दुचाकीस्वारांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होता करीत असताना ही बोललो पलटी झाली या घडलेल्या विचित्र अपघातात उपरोक्त तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून इजाज पठाण नामक गंभीर असल्याने त्यांना अकोला हलविण्यात आले आहे
Post a Comment