अग्रवाल हॉस्पिटल मध्ये आयोजित केलेल्या शिबिरामध्ये 150 च्या वर नागरिकांनी घेतला लाभ!
खामगाव:- खामगाव प्रेस क्लबचे सल्लागार, ज्येष्ठ संपादक, समाजसेवक श्री. जगदीशजी अग्रवाल यांच्या वाढदिवसा निमित्त दि. 2 मे मंगळवार रोजी अग्रवाल हॉस्पिटल, खामगाव येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वरील आयोजन हे खामगाव प्रेस क्लब, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि राज्य मराठी पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन जीएसटी उपआयुक्त डॉ. चेतनसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर भोसले हे होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा सरसंघचालक बाळासाहेब काळे, तसेच संघाचे जेष्ठ समाधान खराटे, खामगावरत्न फिंगर आर्टिस्ट आय.ए.राजा, संपादक योगेश हजारे, संपादक नितेश मानकर हे होते.
या शिबिरामध्ये अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल यांनी रुग्णांची तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन दिले. शिबिरामध्ये बी.एम.डी. टेस्ट म्हणजे हाडाच्या ठिसूळतेची मशीनद्वारे तपासणी, हिमोग्लोबिन टेस्ट, ब्लड शुगर टेस्ट मोफत करण्यात आली.
शहरातील अनेक मान्यवरांनी या शिबिराला भेट देऊन श्री. जगदीशजी अग्रवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संभाजीराव टाले यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले.
Post a Comment