पहात रहा janopchar


 आर.टी.एस.ई. परीक्षेत पुष्कराज धनंजय देशमुख ने मिळवला राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान



खामगाव : राज्यस्तरीय आर.टी.एस.ई. परीक्षेचा निकाल जाहीर जाहीर असून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान  जिल्ह्यातून खामगाव येथील  इयत्ता ५ वीचा विदयार्थी  पुष्कराज धनंजय देशमुख यास मिळाला आहे. पुष्कराज हा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव धनंजयदादा देशमुख यांचा सुपूत्र आहे.


  पुष्कराज धनंजय देशमुख हा एस एस डी व्हि ज्ञानपीठ खामगांव व डिझायर कोचिंग क्ला्सेसचा विद्यार्थी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थी राज्यात प्रथम ही जिल्ह्यासाठी तसेच खामगावकरीता अभिमानास्पद बाब. मानल्या जात आहे.

राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर इयत्ता २ री ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी RTSE FOUNDATION  व डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदे द्वारे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण मानल्या जाणारया Rationalist Talent Search Examination (RTSE) 2023 च्या निकालाबाबत विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये अतिशय उत्सुकता होती. सदरील परीक्षेचा निकाल आज दि. ०९ /०४ /२०२३ रोजी परीक्षेच्या अधिकृत www.rtsexam.com  ह्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षेचे संचालक तथा डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल व डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे संस्थापक यांनी आज दिली.

  दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यातील २९५ परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या सदरील परीक्षेत राज्यात प्रथम येवून राज्यस्तरीय स्कॉलरशिप मिळवत जिल्ह्याचे नाव लौकिक केले असून जिल्ह्यातील इतर २९ विद्यार्थी सदरील परीक्षेच्या जिल्ह्यास्तरीय  शिष्यवृतीस पात्र झाले आहेत.

 राज्य व जिल्हा स्तरावर यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थाना दरवर्षी स्मृतिचिन्ह, मेडल व शिष्यवृत्ती देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते

सुरु झालेला हा उपक्रम आता राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सलग दहा वर्षापासून सुरु असून त्याचे राज्यभर कौतुक व प्रशंसा केली जाते. या परीक्षेत  पुष्कराज धनंजय देशमुख याने यश संपादन केलं असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post