प्रथमच झालेल्या सामाजिक एकतेच्या कार्यक्रमाची प्रशंशा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- दि 13 एप्रिल गुरुवार ला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त रमाई बहुउद्देशीय संस्था व दि ग्रेट महाबोधी नवयुवक मंडळाचे वतीने बोरीअडगाव ता खामगाव येथे पवित्र रमजान महिना रोजा उपवासाचे निमित्ताने सर्व जाति धर्मिय स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता,
बोरी आडगाव समाजमंदिर पटांगणात सायं 7. वाजता या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पोलिस पाटील, रमेश सोळंके तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, पांडुरंग कीर्तने ज्ञानेश्वर ठाकरे,मजहर पठाण, मौलाना अशिफ भाई पठाण निरानी मज्जित,शेख नांनु, शेख महबुब, लुकमान पैलवान, शेख हारून, शेख शब्बीर भाई,उस्मान टेलर ,सै एजाज भाई, अब्बास भाई, सुभाई भाई, शेख रहमान, खुतबोदिन भाई,दोन्ही मजिदचे मौलाना,व शेकडो मुस्लिम बांधव व हिंदू व बौद्ध बांधव उपस्थित होते
प्रास्ताविक, गौतम सुरवाडे, संचालन विनोद सुरवाडे, आभार रामदास वाघमारे यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिध्दार्थ सुरवाडे,आनंद सुरवाडे,राज सुरवाडे,अनुप सुरवाडे, मुन्ना सुरवाडे, पप्पू सुरवाडे, विकी सुरवाडे, सर्व नवयुवक मंडळाचे सदस्य, यांनी खूप मेहनतीने काम केलं या कार्यक्रमा साठी गावातील नागरिक सदाशिव पाटील, भीमराव सुरवाडे, गजानन सुरवाडे,श्याम कीर्तने,गजानन डबेलकर, निवृत्ती माजुषकर, हिम्मत सुरवाडे, प्रल्हाद दुतोंडे,पुरुषोत्तम मेतकर प्रवीण जुमले, अनंता जुमळे, मंगेश तायडे, राजेश शिरसाट दोन्ही गावांतील सर्व जाती धर्माचे नागरिक,तरुण मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, शुभचिंतक , पत्रकार बांधव हजर होते,शेवटी सर्व उपस्थीताना फळे व शरबत वाटप करण्यात आले.
प्रथमच बोरी अडगाव मधे या स्नेहमेळाव्याचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले होते. अश्या आगळा वेगळा इतिहासिक कार्यक्रम गावामध्ये प्रथमच झाला.
Post a Comment