*खामगाव पोलीस

 अनोळखी प्रेताची चार तासात पटली ओळख


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाडी शिवारात आज कुजलेल्या अवस्थेत पुरुष जातीचे प्रत मिळून आले होते. अवघ्या चार तासात या अनोळखी इसमाचा शोध पोलिसांनी लावला असून त्यांच्या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

   मिळालेल्या माहितीनुसार वाडी शिवारातील एका शेताच्या धुऱ्याच्या बाजूला अंदाजे 45 ते 50 वर्ष मृतदेह असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी तात्काळ पोलीस पथकाला रवाना करून शोध कार्य हाती घेतले. दरम्यान तपास अधिकारी गौतम इंगळे यांच्यासह शिवाजीनगर पोस्ट के थानेदार परदेशी यांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले दरम्यान अवघ्या चार तासात सदर मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले. शेख हारून शेख शरीफ असे मृतकाचे नाव असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले .13 एप्रिल रोजी हारून हा बेपत्ता झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोस्टल दाखल आहे

Post a Comment

Previous Post Next Post