गरडगाव येथील आरोग्य तपासणी शिबिरात 500 हून अधिक रुग्णांची तपासणी
खामगाव (जनोपचार न्युज)- विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त तसेच कालकथित मनकर्नाबाई नामदेव सुर्यवंशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गारडगाव येथे घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात 500 हून अधिक रूग्णांनी लाभ घेतला. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्याहस्ते तर बौध्द साहित्याचे अभ्यासक तथा उत्कर्ष बहुउदेशिय संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरूषोत्तम उपर्वट, मानराज मोटर्सचे मॅनेजर अलिम सैय्यद यांच्या उपस्थित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून शिबिराची सुरूवात करण्यात आली.
या शिबिरात डॉ.सुरेश सिरसाट, डॉ.अजिंक्य वराडे, डॉ.विकास चरखे, डॉ.अदित्य सिरसाट, डॉ.बी.एस.तेलंग, डॉ.अरूण पानझाडे, डॉ.अभिलाष खंडारे, डॉ.नितीन चव्हाण, डॉ.प्रतिक वराडे आदी डॉक्टरांनी रूग्णांनी तपासणी केली. तत्पूर्वी झालेल्या औपचारीक कार्यक्रमात डीवायएसपी अमोल कोळी, ठाणेदार सतीष आडेंं, ठाणेदार गजानन वाघ आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाला यशस्वीकरण्यासाठी विनोद वानखडे, धम्मा गवारगुरू, अनिल हिरोडे, चेतन सुर्यवंशी, गुणवंता सुर्यवंशी, रतन सुर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ मंंडळींनी सहभाग घेतला.
Post a Comment