कॉ. नानासाहेब कविश्वर स्मृती प्रित्यर्थ पंचशील होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय येथे रक्तदान शिबीर संपन्न...



खामगाव:- कॉ. नानासाहेब कविश्वर स्मृती प्रित्यर्थ पंचशील

होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.

या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून पंचशील होमिओपॅथीक शिक्षण प्रसारक मंडळाचे

अध्यक्ष डॉ. दादासाहेब कविश्वर हे होते. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजिंक्य कविश्वर आणि जेष्ठ

प्रा. डॉ. यशवंत वानखडे, डॉ. सचिन बघे मनोविकार तज्ञ, उपजिल्हा रुग्णांलयाच्या रक्त पेढीअधिकारी राजश्री पाटील मॅडम, कॉ. प्रकाश पताळे उपस्थीत होते. लॅब टेक्नेशिएन म्हणून कमलशिंदेताई व श्री. पराते भाऊ आदी उपस्थीत होते. या शिबीरामध्ये एकुण २८ रक्तदात्यांनी रक्तदानकेले.


या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजिंक्य कविश्वर यांनी केले तर

डॉ. यशवंत वानखडे यांनी रक्तदान शिबीर आणि दि. कॉ. नानासाहेब कविश्वर यांचेविषयी बोलतांना

म्हणाले की कॉ. नानासाहेब कविश्वर हे संघर्षशील व्यक्तीमत्व होते. तसेच डॉ. दादासाहेब कविश्वर

यांनी रक्तदान हे जिवन दान असून समाजातील तरुण पिढीने रक्तदान करावे असे आव्हान केले

तसेच दि. कॉ. नानासाहेब कविश्वर यांचे कार्यावर बोलतांना म्हणाले की कॉ. नानासाहेब कविश्वर

यांनी त्यांचे जिवनाचे १९७९ पासुन कष्टकरी, शोषीत, दिनदुबळया व्याक्तीना आलेल्या अडचणी

त्यांनी दुर करण्यासाठी ते आयुषभर झटत राहीले. तसेच किसान सभाचे माध्यमातुन आणि शेतकरी

चळवळीचे नेतृत्व करतांना त्यांनी अनेक वेळा आंदोलण, उपोषण, जेलभरो आंदोलन केले. तसेच

सामाजिक व राजकीय कार्य करतांना त्यांचेकडे आलेल्या व्यक्ती कोणत्या पक्षाची किंवा जाती धर्माची

आहे हे कधीहि बघीतले नाही. तर त्याचे काम किंवा कोणती समस्या आहे जे जाणुन घेत आणि त्याचे

काम किंवा समस्या कशी दूर करता येईल याबद्यल ते प्रयत्नशील राहीले असे विचार व्यक्त केले.

त्यानंतर सौ. राजश्री पाटील मॅडम यांनी रक्तदानाचे महत्व व तरुणांनी यामध्ये जास्तीत जास्त

पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रशांत कुलकर्णी व डॉ. माधुरी वानखेडे यांनी केले तर आभार

प्रदर्शन डॉ. स्वाती तराळे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शिक्षक व शिक्षकेत्तर

कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post