उत्कृष्ट लीड स्कुलिंग प्रणाली राबविल्याबद्दल जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरला आचार्य अवार्ड
खामगाव- शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक मिळविणाऱ्या प्रा. रामकृष्ण गुंजकर सरांच्या आवार येथील जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरला उत्कृष्ट लीड स्कुलींग प्रणाली राबविल्याबद्दल लीडच्या वतीने आचार्य अवार्ड प्रदान करण्यात आला आहे.
जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरातील शाळांपेक्षाही चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याठिकाणी नर्सरी पासून ते दहावीपर्यं नवीन टेक्नॉलॉजी लीड स्कुलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टीव्ही स्क्रीन व सर्व शिक्षकांना टॅब आणि आणि टीव्ही याला नेट सर्वर जोडून शिक्षण देण्यात येत आहे. अशी आधुनिक लीड स्कुलिंग शिक्षण पद्धती आणि टेक्नॉलॉजी वापरणारी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर ही संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे. सत्र 2022 23 मध्ये जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये लीड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्षभर टीव्ही, शिक्षकांना टॅब आणि टीव्ही कनेक्टेड नेट सर्वरच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाची संपूर्ण डिजिटल पद्धत अवलंबण्यात आली.यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून व ग्रामीण भागात असणाऱ्या या शाळेने अमुलाग्र बदल घडविला आहे. या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेली प्रगती बघता पालकांचा या नवीन डिजिटल पद्धतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लीड च्या माध्यमातून शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आणि तीन महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांनी घेतलेली लीड कॉन्फरन्स या सर्व बाबीचा विचार करून जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरला आचार्य अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. गुंजकर सचिव प्रा. सुरेखा गुंजकर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच यानिमित्त जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरणे संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात आपला धबधबा निर्माण केला आहे. यामुळे आतापासूनच निकाल लागण्या अगोदर जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर येथे नवीन सत्रा करीता १५० विद्यार्थ्यांची बुकिंग झालेली आहे.
Post a Comment