ग्राहकां सोबत उद्धट वागणूक!

 पोस्ट ऑफिस मधील मुजोर कर्मचाऱ्याची वरिष्ठा कडे तक्रार

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-  खामगाव येथील मुख्य पोस्ट ऑफिस मधील काउंटर नंबर ४ वरील कर्मचाऱ्याची उद्धटबाजी वाढली असून या कर्मचाऱ्याची आता रितसर तक्रार करण्यात आली आहे .त्यामुळे आता वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे लक्ष लागू आहे.


या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मुख्य डाक विभागातील कर्मचारी प्रशांत तायडे यांच्याकडून ग्राहकांना अर्थात खातेदारांना नेहमीच त्रास देण्यात येतो . दरम्यान आज एडवोकेट चैतन्य जोशी यांनी वरिष्ठान कडे रितसर तक्रार केली आहे. पाच पानांची ही तक्रार असून वरिष्ठ काय कारवाई करतात हे आता पुढे येईलच तत्पूर्वी कोणालाही असा त्रास असल्यास त्यांनी पोस्टमास्टर अथवा त्यांच्याही वरिष्ठांकडे तक्रार करावी जेणेकरून अशा मुजोर व कामचुकर कर्मचाऱ्यावर अंकुश ठेवता येईल.

Post a Comment

Previous Post Next Post