'पगार पाहिजे, मलिदा पाहिजे, लाच पाहिजे अन् पेशनही',
खामगाव जनोपचार सोशल मीडिया प्रतिनिधी:
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करण्यात यावी, यासाठी दि. १४ मार्च रोजी राज्यातील १८ लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. दरम्यान,सोशल मीडियावर शेतकरीपुत्र आणि सामान्य नागरिकांकडून पेशंनविरोधात प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. 'पगार पाहिजे, मलिदा पाहिजे, लाच पाहिजे अन् पेशनही', अशा भावनाकरताना शेतकऱ्यांप्रमाणे कर्मचान्यांनी सेवानिवृत्तीनंतर शेळ्या कोंबड्या पाळाव्यात, असा सल्लाही देण्यात येत आहे. राज्य सरकारी कर्मचान्यांनी जुनी पेंशन लागू करण्याची मागणी करत मंगळवारपासून संप पुकारलेलाआहे. या संपात सर्वच कर्मचारी संघटना एकवटल्या असून सर्वच शासकिय कार्यालयातील कामकाज ठप्प आहेत.परिणामी, संपूर्ण यंत्रणेवर परिणाम होत आहे. शाळा, महाविद्यालय अन् रुग्णालयातही पाहिजे तेवढे कर्मचारी दिसत नाहीत. या संपाची धार वाढत आहे. दरम्यान कविता देव म्हणून संबोधणाऱ्या रुग्ण सेवकांच्या पेन्शन विरुद्ध ओरड असल्याने त्यांची नाराजी पसरली आहे
Post a Comment