भयमुक्त खामगांवसाठी ठीक ठीकान च्या तक्रारपेट्या झाल्या कार्यान्वित
खामगांव:शहरामध्ये स्त्रीया व मुली यांचेवर होणारे अन्याय अत्याचार कमी करण्याकरिता तसेच मुलींसंदर्भात होणारे छेडछाछीचे गुन्हे कमी करण्याकरिता व त्याला आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, बुलडाणा, मा. अपर पोलीस अधीक्षक, खामगांव व मा. पोलीस उप अधीक्षक, खामगांव यांचे संकल्पनेतून भयमुक्त खामगांव होण्याकरिता शहरात पोलीस विभागाचे वतीने तक्रार पेटया ठेवण्यात आलेल्या आहेत.
सावरकर उद्यान, खामगांव, BHMS कॉलेज, खामगांव, नॅशनल हायस्कुल, खामगांव. जि. एस. कॉलेज, खामगांव. ITI कॉलेज मेन गेट, जलंब रोड, खामगांव.6. नाना नानी पार्क, जलंब रोड, खामगांव .महीला महाविद्यालय, खामगांव. अंजुमन हायस्कुल, खामगांव. 9. पो.स्टे. खामगांव शहर मेन गेट .कन्या हायस्कुल, खामगांव. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, खामगांव. 13. जे. व्ही. मेहता हायस्कुल, खामगांव. केला हिंन्दी हायस्कुल, खामगांव. शिंगणे महाविद्यालय, चांदमारी, खामगांव. बसस्थानक, खामगांव. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या तक्रार पेटयांमध्ये महिला, मुली, त्रस्त नागरिक यांना आवाहन करण्यात येते की, आपल्या विरुध्द घडणा-या अपराधा संदर्भात तसेच प्रकारा संबंधात जे पोलीस स्टेशनपर्यंत येवु शकत नाही किंवा काही कारणास्तव आपले नांव समोर येवू नये नांव गुप्त राहावे असे वाटत असेल त्यांनी सदर तक्रार पेट्यांमध्ये आपली लेखी तक्रार टाकावी. त्यावर शहानिशा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तक्रारदाराचे नांव गुप्त ठेवण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. सदर तक्रारपेटया प्रत्येक शनिवारी उघडण्यात येतील.तसेच महिला, मुली व नागरिक आपल्या तक्रारी खालील नंबरवर देखील नोदंवू शकतील.
1. पोलीस स्टेशन- खामगांव शहर- 07263-252038.
2. डायल 112. असे आव्हान (एस. आर. पाटील) पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन खामगाव शहर यांनी केले आहे
Post a Comment