जागतिक महिला दिनी महिला पोलिसांचा सन्मान!
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क):- आज जागतिक महिला दिना निमित्त बुलढाणा जिल्ह्यातील ठाणेदार पदाची धुरा महिला अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पडली.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला .यामध्ये खामगाव शहर पोलीस स्टेशनचा प्रभार ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक राची पूसाम यांना सोपविला तर स्टेशनरी अंमलदार संध्या टातरकर , सीसीटीएनएस प्रमुख प्रीती चव्हाण, ठाणा हजेरी सुनीता कश्यप असा पदभार देण्यात आला होता .एकंदरीत महिला दिनानिमित्त महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वी रित्या आपापल्या ठाण्याची कामगिरी बजावली.
Post a Comment