प.पू.श्री शंकरजी महाराज यांच्या सुमधुरवाणीतुन राम कथेचे आयोजन

खामगाव      :  अनंत विद्या विभुषित प.पू.शंकरजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतुन दि.२२मार्च ते ३० मार्च २०२३ पर्यंत राम कथेचे आयोजन करण्यात  आले आहे. सदर राम कथा ही उद्योजक जनार्दन हेंड पाटिलयांच्या कृष्णार्पण डिपी रोड खामगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा सुप्रसिद्ध उद्योजक जनार्दन हेंड पाटिल परिवाराच्या वतीने गुढीपाडवा दि.२२ मार्च पासून राम कथेचे आयोजन करण्यात  आले आहे. या राम कथेची सांगता प्रवचन व महाप्रसादाने दि.३० मार्च रोजी होणार आहे. राम कथा श्रवणाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक हेंड पाटिल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post