होळी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या सूचना
खामगाव न्यूज नेटवर्क :होळी धुलीवंदन उत्सवशांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा या दृष्टिकोनातून खामगाव शहर पोलिसांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सूचना दिले आहेत
१-होळीचे रंग खेळताना विषारी केमिकल युक्त फुगे (गुब्बारे) फेकून मारू नये. कारण त्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात केमिकल युक्त पाणी जाऊन त्याचे डोळे कायमस्वरूपी निकामी होऊ शकतात
२- एकमेकांना शिवीगाळ करू नये
३-दारू पिऊन गाडी (वाहन) चालवू नका तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल
४-अफवा पसरवू नये
५-होळी सण उत्साहाने साजरा करा; हातातही पणा करू नका
६-छोट्या छोट्या गोष्टीतून वाद करू नये
वेळ पडल्यास पोलिसांची मदत घ्या असे आव्हान ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी केले आहे
Post a Comment