खामगाव तालुक्यात गारपीट

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी- नाना कोकरे


खामगाव- मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशातच आज 18 मार्च 2023 रोजी दुपारी 3-15 वाजताचे सुमारास तालुक्यातील गणेशपूर परिसरात गारपिटसह पाऊस झाला. यामुळे  गव्हासह इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

जिल्ह्यावर मागील काही दिवसापासून अवकाळी पावसावे सावट असताना खामगाव तालुक्यात 17 मार्च रोजी रात्रीदरम्यान वादळी वारा, विजेच्या कड़कड़ाटासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आज 18 रोजी सकाळपासूनच ढग्ााळ वातावरण असतांना दुपारी अचानक गारपीटसह पाऊस झाला. यामुळे नदीला सुध्दा पूर आला होता. त्यामुळे महसूल प्रशासनाने तातडीने सर्व्हे करून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी माजी आ. नानाभाऊ कोकरे यांनी केली आहे. फोटो गारपीट

Post a Comment

Previous Post Next Post