खामगाव शहर पोलीस स्टेशनचे नेहमी दक्ष

"संताजी व धनाजी" या जोडीचा निरोप समारंभ संपन्न 

         


खामगाव:-  पोलीस स्टेशन खामगाव शहर ला   सहजासहजी कुणीही अधीकारी यायला तयार होत नाही. परंतु अतीशय संवेदनशिल असे समजणार्या खामगाव शहरात. गेली दोन वर्ष सपोनी पांडूरंग इंगळे व सपोनी निलेश सरदार यांनी अहोरात्र मेहनत घेउन आपली सेवा दिली.  सपोनी पांडुरंग इंगळे यांची जळगाव जामोद येथे तसेच सपोनी निलेश सरदार यांची शेगाव शहर येथे बदली झाल्याने खामगाव शहर चे नवनियुक्त ठाणेदार शांतीकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  त्या दोघांचाही निरोप समारंभ पार पडला.  दोनही अधिकार्यांनी आपल्या खामगाव शहरातील कामांचा व आठवणिंचा उजाळा देत  खामगाव वासियांचे आभार मानले. दोनही कर्तव्य कठोर अधिकार्यांची बदली झाल्याने कार्यक्रमाचे वेळी अधीकारी व कर्मचारी व्रूंद भावनिक झाला होता.
                                 जाहिरात

अशी जाहिरात तुमचीही येऊ शकते संपर्क 820 881 94 38

Post a Comment

Previous Post Next Post