ट्रकची दुचाकीला धडक, तीन ठार
खामगाव: जनोपचार
भरधाव ट्रकने धडक दिल्याने तीन जण ठार झाले. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान,ही घटना बाळापूर लाखनवाडा रस्त्यावरील बोरीअडगाव नाल्याच्या पुलानजीक घडली.मृतक हार्दीक वय 04 वर्ष हयांची तब्येत ठिक नसल्या कारणाने फिर्यादी यांचा भाऊ श्रीकांत अर्जुन सुरवाडे वय 26 वर्ष, पुजा रोहीत वानखडे वय 26 वर्ष, मुलगा हार्दीक वय 04 वर्ष व काकु कल्पना शुध्दोधन सुरवाडे वय 34 वर्ष सर्व रा. बोरीअडगाव ता खामगाव असे
बजाज पल्सर मोटर सायकल क्रमांक एम एच 28- BE 5038 ने ग्राम लाखनवाडा येथे दवाखान्यात जात असतांना बोरीअडगाव शिवारामध्ये शेख मुमताज यांचे शेताशेजारी पुलाजवळ 07/15 वा सुमारास आंबेटाकळी कडुन भरधाव वेगाने येणारे विटाची वाहतुक करणारे वाहन ट्रक क्र.MH-04-FU-9177 च्या चालक ने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादी यांचा भाऊ श्रीकांत सुरवाडे याचे ताब्यात असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच 28- BE 5038 हीस ठोस मारुन भाऊ श्रीकांत सुरवाडे काकु कल्पना शुध्दोधन सुरवाडे व मुलगा हार्दीक वानखडे हयांचे मरणास कारणीभुत ठरुन वहीनी पुजा हीला गंभीर जखमी केले व मो.सा. क्र एम एच 28- BE- 5038 हीचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे. फिर्यादी चे अशा तोडी रिपोर्ट वरुन गुन्हा दाखल करून तपास सपोनी लांडे करीत आहेत
Post a Comment