तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात फिर्यादीची न्यायालयात धाव


खामगाव :-   तालुक्यातील हिवरा बु येथील निंबाजी शाळीग्राम वाकोडे हे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश आडे  यांनी सदर तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली,तसेच तुम्ही सदरची तक्रार दिल्यास तुम्हाला खोट्या गंभीर गुन्ह्यात अडकवू अश्या प्रकारच्या धमक्या दिल्या असल्याने फिर्यादीची अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 च्या कलम 4 नुसार जिल्हा विशेष न्यायालय खामगाव येथे अर्ज केला आहे.सदर प्रकरणात तपास अधिकारी म्हणून डीवायएसपी अमोल कोळी यांनी सुद्धा फिर्यादिला मदत केली नसल्याचे ही तक्रारीत म्हटले आहे. तसेच फिर्याद मागे घेण्यासाठी परावृत्त केले आहे.म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी व पि.राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी याकरिता फिर्यादीने अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. सदर प्रकरण न्यायालयात दाखल झाले असून मा. न्यायालय काय निर्णय देते यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

       सदर प्रकरणात फिर्यादीच्या वतीने  अधिवक्ता मिस. एल.एन.हिवराळे(सरदार) मॅडम,ऍड. अभिजीत वानखडे यांनी जोरदार युक्तिवाद कटुन न्यायालयात फिर्यादीची बाजू मांडली. व ऍड.विश्वंभर गवई यांनी विशेष सहकार्य केले.दोषी विरुद्ध न्यायालयात भरभक्कम बाजू मांडून न्याय मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू अशी माहिती विश्वंभर गवई यांनी दिली

Post a Comment

Previous Post Next Post