मॅरेथॉन स्पर्धेत गौरव व कोमल अव्वल

 पावनखिंड दौड स्पर्धेत गौरव धनोकार मुलांमधून प्रथम तर कोमल ने मारली मुलींमधून बाजी



नांदुरा जनोपचार न्यूज नेटवर्क :-शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा प. स  सभापती नांदुरा यांनी महाळुंगी  येथे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती 


त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये बेलुरा येथील चिरंजीव गौरव नंदकिशोर घनोकार हा जिल्ह्या मधुन पाचव्या क्रमांकावर जिंकून आला आणि त्यानंतर दिनांक29/1/2023 ला बेलुरा येथे स्वर्गीय सितारामजी घनोकार यांच्या स्मृती पित्यर्थ त्यांचे सुपुत्र अशोकराव सितारामजी घनोकार यांनी पावनखिंड दौड स्पर्धा आयोजीत केली होती त्यामध्ये तीनकिलोमीटर धावण्याची स्पर्धा यामध्ये गौरव नंदकीशोर घनोकार हा प्रथम क्रमांक घेऊन स्पर्धा जिंकला तर मुलींमधून कोमल अजय धनोकार हिने प्रथम क्रमांक मिळवला त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे



Post a Comment

Previous Post Next Post