सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्या वतीने आयोजित भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

 लोहार समाज बांधवांच्या विकासासाठी सदैव कटीबध्द राहिल- आमदार अँड़ आकाशदादा  फुंडकर



जनोपचार न्यूज नेटवर्क

खामगाव - सोमवंशी आर्य क्षत्रिय समस्त लोहार समाजाच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत़ अशी ग्वाही खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अँड़ आकाशदादा फुं डकर यांनी आज ३ फे ब्रुवारी रोजी येथील सोमवंशी आर्य क्षत्रिय लोहार समाजाच्या वतीने आयोजित भगवान विश्वकर्मा महाराजांच्या जयंती निमित्त उपस्थित समाज बांधवांना दिली़ या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आ़ अँड़ आकाशदादा फुं डकर हे उपस्थित होते़ तर प्रमुख उपस्थिती म्हणून खामगाव ऩप़ चे माजी उपाध्यक्ष वैभव डवरे, नगरसेवक जयवंत पिंपळे, काशिनाथ चव्हाण, डिगांबर मानेकर, भास्कर हरिहर, कैलास देवताळू, अमोल सिरसाट, मुन्ना जाधव, योगेश उर्फ पिंटू जाधव आदिंची उपस्थिती होती़ यावेळी उपस्थित प्रमुख पाहूण्यांचा समाजबांधवांच्या हस्ते शाल श्रीफ ळ देवून सत्कार करण्या आला़

पुढे बोलतांना आ़ आकाशदादा फुं डकर म्हणाले की, लोहार समाज नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे़ आपल्या पाठिंब्यामुळेच आम्ही शहराचा कायापालट करण्यात यशस्वी झालो आहे़ लोहार समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच कटीबध्द आहोत़ लोहार समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील एकजूटता दिसून आली आहे़ समाजाच्या विकासासाठी सदैव समाजाने एकत्रित येणे गरजेचे आहे़ एकत्रित येवूनच आपण विकास साधू शकतो़ असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी आ़ फुं डकर यांनी केले़ यावेळी माजी ऩप़ उपाध्यक्ष वैभवदादा डवरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक असा लोहार समाज आहे़ आ़ आकाश फुं डकर यांनी प्रत्येक समाजाला योग्य न्याय दिला आहे़ लोहार समाजाच्या विकासासाठी आणि अडीअडचणी सोडविण्यासाठी आ़ फुं डकर सदैव तत्पर राहतील़ समाजाने नेहमीच छोटे-छोटे कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रगती साधावी़ लोहार समाजाने सभागृहाच्या मागणीसोबत इतरही काही कार्य असतील ते आ़ फुं डकर यांच्या माध्यमातून सोडवून घ्याव्या़ लोहार समाज हा दणकट आणि मजबुत समाज आहे़ जीथे कुदळ मारेल तिथून पाणी काढेल असा लोहार समाज आहे़ असेही डवरे म्हणाले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुप गवळी यांनी केले़ प्रास्ताविकेत त्यांनी समाजाची माहिती करून देतांना म्हणाले की, लोहार समाज अगदी आदिम काळापासून मानवी विकासात व समाज व्यवस्थेत अतिशय महत्वपूर्ण योगदान देणारा कष्टाळू व प्रामाणिक असा आमचा लोहार समाज आहे़ परंतु समाजाची आजच्या भांडवलीकरण, औद्योगिकरणामुळे झालेली अधोगती आणि दुरावस्था आज समाजाला मागासलेपणाची आठवण करून देत आहे़ लोहार समाजात लोहार, गाडी लोहार, पांचाळ, जिनगर, नालबंदी, घिसाडी अशा अनके  पोटजाती आहेत. लोखंडी भांडी तयार करणे, फॅब्रिकेशन, हार्डवेर, फर्निचर, गॅरेज नालबंदी आदि परंपरागत व्यवसाय करून हे आपला पोट भरतात़ याचबबरोबर समाजातील बांधवांनी त्यांच्या मुलांचे कष्टाने पालन पोषन करून त्यांना उच्चशिक्षीत केले आहे़ समाजातील अनेक तरून युवक आजरोजी आयपीएस, आयएएस, इंजिनिअर होवून अनेक मोठ्या पदावर कार्यरत आहेत़ हळूहळू लोहार समाजही शिक्षणाची कास धरून समाज आणि व्यवस्थेत योगदान देत आहेत़ अशी माहिती अनुप गवळी यांनी दिली़ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिध्दार्थ वानखेडे यांनी केले़ तर आभार प्रदर्शन भावेश चव्हाण यांनी केले़ कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल समाजाच्या डाँ़ सौ़ शितल भावेश चव्हाण यांचा आ़ फुंडकर यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला़ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशांत चवरे साहेब, काशीनाथ चव्हाण, मुन्ना जाधव, गणेश वानखडे,भास्कर  हरिहर,भावेश चव्हाण, अनुप गवळी,पिंटू जाधव ,शाम वानखडे, राजू मोरे,सचिन थोरात,अभय वानखडे, महेंद्र बनसोड,रुपेश शिंदे,अंकित वानखडे,जितू वानखडे गणेश चव्हाण, मनोज चव्हाण, आदिंनी परिश्रम घेतले़.

लवकरात लवकर लोहार समाज सभागृह बांधून देवू- आ़ आकाश फुंडकर

लोहार समाजाचे खामगाव शहर व परिसरात सुमारे 350 ते 400 कुटूंब वास्तव्यास आहे़ विश्वकर्मा जयंती निमित्त समाज बांधवांनी आ़ अँड़ आकाशदादा फुंडकर  यांच्याकडे सोमवंशी आर्य क्षत्रिय लोहार समाजासाठी शहरात भव्य सभागृहाची मागणी केली होती़ मागणीला उत्तर देतांना आ़ फुं डकर यांनी लोहार समाजाची सभागृह आणि विश्वकर्मा मंदिराची मागणी रास्त असल्याचे सांगत तातडीने लोहार समाजासाठी सभागृह बांधून देण्याचे आश्वासन वजा ग्वाही यावेळी आ़ अँड़ आकाशदादा फुं डकर यांनी लोहार समाज बांधवांना दिली़ 

लोहार गल्लीच्या कमानीसाठी प्रयत्न करू

शहरातील सतीफै ल भागातील लोहार गल्ली मध्ये अनेक वर्षापासून लोहार समाज बांधव राहतात़ त्याठिकाणी लोहार गल्लीच्या प्रवेश व्दाराजवळ कमाण बांधण्याबाबत लोहार समाजाच्या नागरीकांची मागणी सुरू होती़ याबाबतही लक्ष वेधत आ़ आकाशदादा फुं डकर यांनी लोहार गल्लीच्या कमाणीच्या निर्मितीसाठीही प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले़

Post a Comment

Previous Post Next Post