मोठी देवी सेवाधारी मंडळातर्फे भंडारा

पळसखेड येथील मनोरुग्णांना महाप्रसादाच्या वितरणाने भंडाऱ्याला सुरुवात।

 


    

  जनोपचार न्यूज

 खामगाव  :- दरवर्षी मोठी देवी शांती उत्सव झाल्यानंतर,मोठी देवी सेवाधारी मंडळ मोठ्या भक्ती भावाने मोठी देवीचे मूळ ठिकाण बोधन येथे (आंध्र प्रदेश) वारी करिता जात असतात,व तेथून आल्यानंतर सेवाधारी मंडळा तर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येत असते,ही परंपरा अनेक दशकांपासून सेवाधारी मंडळ आज पावेतो जोपासत आहे,यावर्षी सुद्धा जनुना तलाव येथील रेणुका माता मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, यानिमित्त दि.८ जाने.रविवार रोजी सर्वप्रथम मोठी देवी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव उंबरकर यांच्या हस्ते मातेची आरती व विधिवत पूजन करून,उंद्री पासून जवळच असलेल्या,पळसखेड येथे, दीड एक्कर परिसरात डॉ.पालवे दांपत्य द्वारा स्थापित सेवा संकल्प प्रतिष्ठान,येथे मनोरुग्णांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले,व नंतर खामगाव येथील रेणुका माता मंदिर जनूना तलाव येथे महाप्रसादाला सुरुवात झाली,सेवा संकल्प प्रतिष्ठान तर्फे सेवाधारी मंडळाच्या या कार्याचे कौतुक करून सर्वांनी अशाच प्रकारे या सेवा यज्ञात अपेक्षित           सहकार्य करणे गरजेचे आहे,अशी प्रतिक्रिया प्रतिष्ठाना तरफे व्यक्त करण्यात आली,यावेळी सेवाभावी मंडळाने जनसामान्यांच्या सेवेसाठी आमचे नेहमीप्रमाणे, येणाऱ्या काळातही पुढाकार राहील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। डाॅ.पालवे दांपत्य आपल्या सेवाभावातून शेकडो निराश्रीत व आपल्या परिवारापासून दुरावलेल्या, उघड्यावर वेदनादायी जीवन जगणाऱ्या अनेकांना त्यांनी येथे आश्रय व हक्काचं घर आज येथे मिळवून दिल आहे,आज मीतीस जवळपास २२५ मनोरुग्ण येथे स्थायिक आहेत। व ते त्यांची निरंतर सेवा करीत आहेत।          


                     

आज जनुना तलाव येथील रेणुका माता मंदिर परिसरात आयोजीत भंडाऱ्या मुळे तेथे यात्रेचे स्वरूप दिसत होते,शहरातील हजारो भाविकांनी भांडाऱ्याला लक्षनिय उपस्थिती दर्शविली, जवळपास ३००० च्यावर भाविकांनी येथे महाप्रसादाचा लाभ घेतला,याप्रसंगी मोठी देवी उत्सव दरम्यान सेवाधारी मंडळातर्फे घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तवीरांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले। यासाठी मोठी देवी सेवाधारी मंडळाचे सेवाधारी व मातेच्या अनेक भक्तांनी अथक परिश्रम घेतले।

Post a Comment

Previous Post Next Post