मानाचा खामगाव रत्न पुरस्कार सी.एन.देशमुख यांना तर खामगाव गौरव पुरस्कार अंजुमन ऐज्युकेशन सोसायटी या संस्थेला जाहीर
खामगाव,ता.४ ः (नितेश मानकर) दरवर्षी प्रमाणे यंदाही सहा जानेवारी पत्रकार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. खामगाव प्रेस क्लब खामगावच्या वतीने दिला जाणारा मानाचा खामगाव रत्न पुरस्कार यंदा कामगार क्षेत्रात प्रभावशाली काम करणारे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (आयटक) या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ. चंद्रकांत निळकंठराव देशमुख उर्फ सी.एन. देशमुख यांना तर खामगाव गौरव पुरस्कार शहरातील शंभरवर्ष पुर्ण करीत असलेल्या तसेच ऐतिहासीक वारसा लाभलेली शिक्षण अंजुमन ऐज्युकेशन सोसायटीला जाहीर करण्यात आला आहे. तसेच पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पत्रकाराला स्व.बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकार पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. तर युवा पत्रकारांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने नव्याने यावर्षीपासून युवा पत्रकार प्रेरणा पुरस्कार देण्यात येणार आहे.
पत्रकार दिनाचा सोहळा दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार भवनामध्ये पार पडणार असून, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.ॲड. आकाशदादा फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांची उपस्थितीत व प्रेस क्लब पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व मान्यवर पत्रकार बांधंवासह साहित्यीक, कवी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खामगाव प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment