*शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्रदान*
*खामगांव* - मेष्टा राज्यस्तरीय अधिवेशन 2023 मुंबई येथे पार पडत असून आज ०५/ ०१/२०२३ ला श्री सरस्वती इंग्लिश स्कूल अंत्रज ला बेस्ट स्कूल अवार्ड ने सन्मानित करण्यात आले आहे . शालेय शिक्षण मंत्री मा. दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्कृष्ट शाळा पुरस्कार श्री सरस्वती इंग्लिश स्कूल अंत्रज ता - खामगाव जि- , बुलढाणा यांना प्रदान करण्यात आला आहे.
शाळेची स्थापना 2013 मध्ये झाली.पंचक्रोशितील मुलांनी इंग्लीश, सेमी इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेता यावं प्रत्येक घटकातील मुलांना इंग्रजी भाषेत बोलता यावं आणि उच्चशिक्षित होऊन सामाजिक हित जोपासावे हा उद्देश ठेवून संस्थेने अनेक उपक्रम हाती घेतले असून संस्थेच्या माध्यमातुन अनेक उपक्रम राबविले आहेत .मेस्टा-वार्षिक परिषद-2023 महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित डॉ. संजयराव तायडे पाटील (मेस्टा चे संस्थापक अध्यक्ष ) उपस्थित होते. .5 आणि 6 जानेवारी २०२३ तीन दिवसीय हे आधिवेशनात हा पुरस्कार देण्यात आला आहे - प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर सन्माननीय अतिथी मा. दिपकजी केसरकर (कॅबिनेट मंत्री, शालेय शिक्षण)मा. श्री चंद्रकांत दादा पाटील (कॅबिनेट मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण)मा. श्री ओमप्रकाश (बच्चूभाऊ) कडू (विधानसभा सदस्य)मा. श्री सचिन अहिरे (राज्य अध्यक्ष, राष्ट्रीय मिल मजदूर संघ) मा. मा.श्री.संजयजी केळकर (विधानसभा सदस्य) श्री .अनिल घेवंदे अध्यक्ष प्रहार जनशक्ति पार्टी ,श्री श्री .निरंजन निरंजन डावखरे साहेब मा. श्री रविंद्रजी चौहान कॅबिनेट पीडब्ल्यूडी मंत्री, महाराष्ट्र) यांच्या प्रमूख उपस्थितीत राहणार आहेत. शाळेतील सर्व कर्मचारी याची कर्तबगार कामगिरी या ठिकाणी दिसून येते तर स्वामी विवेकानंद महाविद्यालय या परिसरात सुरू करून विद्यार्थ्यानी महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेत असल्याचा आनंद देखील होत आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.संजय यांनी सागितले.तर शालेय कर्मचारी, विध्यार्थी पालक वर्ग व मित्र परिवारांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.सर्वांच्या अथक परिश्रमातून पुरस्कार मिळाले.तर शालेय कर्मचारी विध्यार्थी पालक वर्ग पंचक्रोशित आनंदाचे वातावरण आहे.
मेस्टाच्या तिन दिवसीय वार्षिक अधिवेशनांचे उद्घाटन मा .ना. दिपक केसरकर यांच्या हस्ते सुरू झाले यावेळी शिवसेना नेते आमदार सचिनजी आहीर , प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री अनिलजी गावंडे व मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॅा. संजयराव तायडेपाटील मेस्टा महा. प्रदेशाध्यक्ष प्रा. डॅा. नामदेवराव दळवी ,मेस्टा महासचिव डॅा. विनोद कुलकर्णी तसेच महीला प्रदेशाध्यक्षा सुदर्शनाताई त्रिगुनाईत यांची उपस्थिती होती.
Post a Comment