ठीक ९ वाजून १५ मिनिटांनी होणार खामगाव येथे शासकीय ध्वजारोहण

 खामगांव येथिल प्रभारी उपविभागीय अधिकारी अतुल पाटोळे यांच्या हस्ते 26 जानेवारी 2023 रोजी 73 व्या प्रजासत्ताकदिनी मुख्य ध्वजारोहण


जनोपचार न्यूज नेटवर्क

खामगांव (उमाका)दि. 24- 

73 वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्य मुख्य शासकीय ध्वजारोहन समारंभ 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 09.15 वाजता खामगांवचे प्रभारी उपविभागीय अधिकारी (महसुल) अतुल पाटोळे यांच्या हस्ते होणार आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 09.15 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नगरपरीषद मैदान, खामगांव येथे आयोजीत करण्यात आला. असल्याने सदर दिवशी सकाळी 08.30 ते 10.00 वाजेच्या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये जर एखादया कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 08.30 वा. च्या पूर्वि किंवा 10.00 वा च्या नंतर आयोजित करावा.

कार्यालय अथवा संस्थेने  ध्वजारोहन कार्यक्रम करावा. दिवसभरात प्रजासत्ताक दिनानिमित्य वृक्षारोपन, देशभक्ती पर विविध गीत स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आपआपल्या स्तरावर करण्यात यावे. प्रजासत्ताक दिनाचा साजेसा समारंभ करावा असे आवाहन खामगांव निवासी नायब तहसिलदार, पवन पाटील  यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post