अनेक ठिकाणचा वीज पुरवठा विस्कळीत


वीज कंपन्यांचे खाजगीकरण होऊ नये, या प्रमुख मागणीसाठी वीज कर्मचारी संपावर गेले असून आज बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत 

 मुंबई : वीज कंपन्यांचे खाजगीकरण होऊ नये, या प्रमुख मागणीसाठी वीज कर्मचारी संपावर गेले असून आज बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत झालेला आहे. राज्यातील जवळपास 86 हजार कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि 42 हजार कंत्राटी कामगार या संपात सहभागी झाले आहेत. वीज कंपन्यांच्या विविध 30 संघटनानी हा संप पुकारला आहे.

*वीज कर्मचाऱ्यांचा संप....ही आहे मागणी*

https://youtu.be/g6IIRn8oGpc

राज्यातील वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्यात येणार असून अदानी ग्रुपसोबत करार करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती कामगारांना मिळाल्याने त्यांनी संप सुरू केला आहे. 72 तासांचा हा संप आहे. 3 जानेवारीच्या रात्री 12 वाजतापासून संपास सुरूवात सुरू झालेली आहे. तिन्हीही वीज कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.


वीज कंपनीचे खासगीकरण करण्याची भूमिका सरकारने बदलली नाही तर बेमुदत संप पुकारण्याच्या हालचाली वीज कंपन्यांचे कर्मचारी करीत आहे. त्यामुळे येत्या काळात सरकारची भूमिका काय राहते हे पाहावे लागणार आहे. दरम्यान आज वीज कर्मचाऱ्यांनी राज्यात ठीक ठिकाणी निदर्शने करत खासगीकरण करू नये अशी मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post