प्रा.डॉ.अनिल अंमलकार यांना पदवीधर मतदारांचा कौल!!
खामगाव : अमरावती पदवीधर संघात वंचित बहुजन आघाडी रिंगणात उतरली असून वंचितने प्रा.डॉ.अनिल अंमलकार यांच्या रूपाने ओबीसी चेहरा निवडणुकीत उतरवीला आहे. उच्चशिक्षीत, समाजाभिमुख व्यक्तीमत्व असलेले प्रा.अमलकार यांना पदवीधर मतदारांचा देखील वाढता कौल दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणुक वंचित बहुजन आघाडी लढविणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संपुर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून खामगाव येथील ओबीसी चळवळीत अग्रेसर असलेले तसेच शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक असलेले प्रा.डॉ.अनिल अमलकार यांना उमेदवारी देवून रिंगणात उतरवीले आहे. प्रा.अमलकार हे खामगाव विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार माणिकराव गावंडे यांचे जावई आहेत. प्रा.अमलकार यांना उमेदवारी जाहीर होताच बुलडाण्यासह अकोला जिल्हा व अमरावती मतदार संघात त्यांच्या नावाची पॉझिटिव्ह चर्चा सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रा.अनिल अमलकार यांनी पदवीधर मतदारांच्या समस्या जाणून घेवून प्रत्यक्षात पदवीध मतदारांशी संवाद साधत आहेत. सुमारे १५ वर्षापासून पदवीधरांच्या समस्यांसाठी ते लढा देत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचा सिंहाचा वाटा राहला आहे. प्रा.अमलकार हे पदवीधरांचे प्रश्न समोर ठेवून निवडणुकीला सामोरे जात असल्याचे प्रा.अमलकार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
Post a Comment